कैलास तांदळे कोरोना योध्दा म्हणून सन्मानित
कैलास तांदळे कोरोना योध्दा म्हणून सन्मानित परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : - कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांचा राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले. कैलास तांदळे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणु रोखण्यासाठी परळी तालुक्यात होऊ नये म्हणून ना.धनंजय मुंड...