झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु
परळी (प्रतिनिधी) -: तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विष्णु गड संस्थानवरील भागवताचार्य कृष्णभक्त श्री ह भ प गणेश महाराज गुटटे यांच्या रसाळ वाणीतुन झी टाॅकिजवर कीर्तन मालिका सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून,परळीतील श्री संत जगमिञ नागा महाराज मंदिर येथे झी टाॅकिजच्या कीर्तन मालिकेचे शूटिंग पार पडले,या अंतर्गत कासारवाडीचे भुमिपुञ श्री ह भ प गणेश महाराज गुटटे यांच्या पाच कीर्तनांचे शूटिंग झालेले आहे. त्याच कीर्तन सेवा दि 17 ऑगस्ट पासुन झी टाॅकिजवर "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा "या कार्यक्रमात दररोज सकाळी 7 ते 9 यावेळेत प्रसारित होत आहेत. दि 17 रोजी-काय सांगु आता संतांचे उपकार,दि 18 रोजी-जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि दि 19 रोजी-सत्य साच खरे या जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा पार पडल्या असुन,अजुन दोन दिवस महाराजांची कीर्तने भाविकांना पहायला मिळतील. तीनही कीर्तनांना परळी तालुक्यातील भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. भाविकांच्या प्रतिक्रिया सोसल मिडीया च्या माध्यमातून व्यकत होताना दिसत आहेत. महाराजांची रसाळ वाणी,प्रभावी वक्तृत्व,व्याकरण-साहित्य-कला-संसकृती-इतिहास आणि वारकरी संप्रदायातील ग्रंथांचे सखोल अध्ययन प्रसारित झालेल्या तीनही कीर्तनांतुन दिसुन आले.छञपती शिवरायांचे जीवनातील प्रसंग महाराजांच्या मुखातुन ऐकताना अक्षरशः अंगावर काटे उभे राहत होते. तर संत चरिञ ऐकताना आपोआप डोळ्यात अश्रू उभे राहत होते,तीनही कीर्तनात महाराज सर्वच आघाड्यांवर यशस्वी झालेले दिसून आले. सदरील कीर्तन मालिका परळी तालुक्याचे भुषण श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्ञी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली आहे.तर भजनी मंडळीचे नियोजन आणि व्यवस्थाापन अ भा वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले आहे. कीर्तनात साथ युवा कीर्तनकार श्री ह भ प जगदीश महाराज सोनवणे,बाल कीर्तनकार श्री ह भ प प्रकाश महाराज फड,बाल कीर्तनकार श्री ह भ प संग्राम महाराज फड यांची लाभली आहे, आत्तापर्यंत महाराजांना गायनसाथ महादेव महाराज दराडे,ऋषीकेश म मुंडे,श्री राजाभाऊ कणसे,मनोज शिंदे,सुनिल केंद्रे,आत्माराम मुंडे,ओमकार मुंडे ,आणि सदाशिव मुंडे तळेगाव यांची तर मृदंगसाथ माधव महाराज उखळीकर, तसेच राधाकिशन महाराज मुंडे पांगरीकर यांची लाभली आहे,विणेकरी म्हणुन श्री संत जगमिञ नागा महाराजांचे पुजारी उदय औटी,वैजनाथ महाराज मुंडे इंदपवाडीकर,शिंदे,गुटटे मामा यांची लाभली आहे. या तीनही कीर्तन सेवेबद्दल गणेश महाराज गुटटे यांचे सर्वञ अभिनंदन आणि कौतुक होत आहे. उर्वरित दोन कीर्तनसेवा सर्व भाविकांनी झी टाॅकिजवर आवर्जून पहाव्यात असे आवाहन संपादक श्री बालासाहेब फड ,नगरसेवक चंदुलाल बियाणी,अ भा वारकरी मंडळी मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे,राष्ट्रीय वारकरी परिषद,विश्व वारकरी सेना,महाराष्ट्र वारकरी महामंडळ ,अखिल वारकरी संघ आदी संघटनेच्या पदाधिकारी मंडळीनी केले आहे
Comments
Post a Comment