तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर


परळी (प्रतिनिधी) -: येथील श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे चित्रीकरण झालेल्या कीर्तन सेवा झी टॉकीज चैनल वरून दिनांक 13 जुलै पासून प्रसारित होत आहेत त्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक श्री ह भ प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर यांची झाली त्यांनी कीर्तनासाठी 'देवाच्या प्रसादे करारे भोजन' हा अभंग निवडला होता .या अभंगावर विवेचन करत असताना महाराजांनी तीर्थक्षेत्र परळी चे वैशिष्ट्य त्यांच्या खुमासदार शैलीमध्ये सांगितले ,परळी क्षेत्र आणि आळंदी क्षेत्र हे एकाच अधिकाराचे क्षेत्र आहेत असे महाराज म्हणाले कारण आळंदी मध्ये सिद्धेश्वर दैवत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संत आहेत त्याचप्रमाणे परळी मध्ये सुद्धा भगवान वैद्यनाथ देव आहे आणि संत जगमित्र नागा हे संत आहेत. भगवान शंकर आणि वारकरी संत असे वैशिष्ट्ये या दोन्ही क्षेत्रांचे आहे. अशा पवित्र क्षेत्रांमध्ये आणि पवित्र साधूच्या दरबारात झी टॉकीज चैनल वर प्रसारित होणारी कीर्तन सेवा सेवा करताना मला अतिशय आनंद होतो आहे असेही महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केले .
सदरील कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन परळी भूषण श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी केलेले आहे महाराजांना संयोजनामध्ये श्री  रामेश्वर महाराज कोकाटे (विभागीय अध्यक्ष अ भा वारकरी मंडळ) आणि युवा कीर्तनकार श्री ह भ प  जगदीश महाराज सोनवणे यांनी बहुमोल सहकार्य केले.  तर मंदिर विश्वस्तांनी सुद्धा या चित्रीकरण प्रसंगी बहुमुल्य असे योगदान दिले.
 या चित्रीकरणादरम्यान मा. चंदुलाल मोहनलाल बियाणी(अध्यक्ष-मारवाडी युवा मंच) यांनी प्रशासनाकडून सहकार्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. आजच्या कीर्तनामध्ये महाराजांना गायनसाथ श्री ह भ प  नामदेव महाराज आघाव व श्री ह भ प  महादेव महाराज दराडे यांनी केली तर मृदंगसाथ श्री ह भ प  अशोक महाराज कराळे यांनी केली. भजनी मंडळ म्हणुन तळेगाव नंदनज आणि कनहेरवाडी येथील भजनी मंडळ यांची उपस्थिती होती उद्या आणि परवा अजून दोन दिवस श्री ह भ प सुदाम महाराज पानेगावकर यांच्याच कीर्तन सेवा झी टॉकीज वरून प्रसारित होणार असुन  तिसर्या भागात मृदंगसाथ करण्यासाठी परळीचे भुमीपुञ बाल कीर्तनकार श्री ह भ प प्रकाश महाराज फड तर गायनसाथ  करण्यासाठी बाल कीर्तनकार श्री ह भ प संग्राम महाराज फड ह. भ प मृदंग साथ अशोक महाराज मुंडे खांदगावकर  राहणार असल्याची माहिती श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्ञी यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे