कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे


 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून "स्वाभिमानी संवाद" या कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्याच्या समस्याचे निराकरण झाले - प्रा. धम्मपाल घुंबरे
 
बीड (प्रतिनिधी)-: स्वाभिमानी महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर असोसिएशन संघटनेच्या वतीने  "स्वाभिमानी संवाद " फेसबुक लाईव्ह संवाद दिनांक 1 जून  पासून ते 8 जून पर्यंत दररोज दुपारी एक वाजता विविध तज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आलेले होते. दि. 8 जून रोजी, अध्यक्षीय समारोप करण्यासाठी स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तथा या स्वाभिमानी संवाद कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रो. शंकर अंभोरे यांनी प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार आणि कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करतेवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 रोजी कर्मचाऱ्यांचे हक्क अधिकार व कर्तव्य कशा पद्धतीचे असावेत हे बाबासाहेबांनी नमूद केले होते. व भारत स्वतंत्र झाल्यानंतर या सर्व हक्क आणि अधिकाराचा समावेश त्यांनी भारतीय राज्यघटनेत कशा पद्धतीने अमलात आणला या विषयी सविस्तर माहिती पुरव्या सहित प्रो. डॉ. शंकर अंभोरे सर यांनी सांगितली. भारतातील राजकीय शिक्षण संस्था व बिगर राजकीय शिक्षण संस्था असोत यामधील 70 ते 80 टक्के संस्थाचालक हे कर्मचाऱ्यांची अडवणूक व पिळवणूक करत असताना पाहायला मिळत आहेत असे प्रो.डॉ.अंभोरे सर म्हणाले. सर पुढे असे सुद्धा म्हणाले की जर या व्यवस्थेला चोप द्यायचा असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे हक्क मागून मिळत नाहीत त्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. डॉ. अंभोरे सर पुढे म्हणाले की हक्क आणि अधिकार सहीत आपले कर्तव्य काय असावेत किंवा कोणते आहेत याविषयी सुद्धा त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वाभिमानी मुप्टा संघटनेने "स्वाभिमानी संवाद"  आयोजित करण्यात आलेल्या या 1 जुन ते 8 जून या आठ दिवस सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व मूलभूत प्रश्नांवर वेगवेगळे विषयावर प्रकाश टाकला. प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी "स्वाभिमानी संवाद" या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.  देशभरामधून असंख्य लोकांनी आपली कमेंट च्या माध्यमातून प्रश्न विचारून स्वतःच्या प्रश्नाचे निराकरण केले. 
या स्वाभिमानी संवाद कार्यक्रमामध्ये डॉ.दिगंबर गायकवाड, प्रा. डॉ. सिद्धार्थ घाटविसावे, प्रा. डॉ. विजयकुमार वावळे, मा.विलास पांडे सर उत्तराखंड राज्यातील प्रा.डा. संजय कुमार टमटा, प्रा.डॉ.दिलीप गरुड आणि प्रा.डॉ.अनिल खंडारे या सर्वांनी फेसबुक लाईव्ह स्वाभिमानी संवाद या कार्यक्रमा मध्ये सविस्तर मार्गदर्शन केले.या फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजनाची तांत्रिक बाबी ज्यांनी सक्षमपणे सांभाळली त्याबद्दल स्वाभिमानी मुप्टा शिक्षक  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रो.डॉ. शंकर अंभोरे यांनी बीड जिल्हा अध्यक्ष प्रा. धम्मपाल घुंबरे व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला