उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला


परळी वै.(प्रतिनिधी) -: लॉकडाऊन मध्ये वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, येथील संवर्धन केलेली जवळपास दोन लक्ष झाडे हिरवाईने बहरली.

वन व समाजिक  वनीकरण विभागाच्यावतीने परळी व परीसरात वसंतनगर, कन्हेरवाडी, रेल्वे स्टेशन येथील डेन्स फॉरेस्ट तसेच आनंदधाम व मालेवाडी परीसरासह जवळपास दोन लक्ष झाडांची लागवड व संवर्धन केल्याने उजाड माळरान हिरवाईने बहरले असून देशी विदेशी प्रजातींच्या वृक्षवल्लीमुळे हे डोंगरमाथे पर्यटन स्थळ बनत आहेत.
अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर शासकिय योजना फलदायी होते. प्रादेशिक वनीकरण व सामाजिक वनीकरण विभागाच्या परळी क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीची योजना हाती घेतली. डोंगरमाथ्यावरील दगडगोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमिनीवर आतापर्यंत फक्त पावसाळ्यात खुरटे गवत उगवायचे त्या माळरानावर वृक्षलागवड योजनेतून वसंतनगर,कन्हेरवाडी,रेवली,व परळी रेल्वे स्टेशन याठिकाणी हेक्टरवर 30 हजार झाडांची  लागवड करीत संगोपन केल्याने हे डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत.
तालुक्यात वनविभागाची शेकडो हेक्टर जमिन आहे.दगडगोट्यांनी व्यापलेल्या या खडकाळ जमिनीवर फक्त पावसाळ्यात गवत असते. बाकी  आठ महिने हे डोंगरमाथे उजाड असतात. बीड येथील विभागीय वनाधिकारी श्री.अमोल सातपुते व श्री.मधुकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे,वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.वरकडे,सामाजिक वनीकरण अधिकारी श्री.भगवान गित्ते,वनपाल श्री.कस्तुरे,श्री.जाधवर तसेच  वनरक्षक श्री.वैजनाथ दौंड व कर्मचा-यांनी या माळरानावर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. कन्हेरवाडी शिवारातील मारूतीजवळ असलेल्या एक हेक्टर व वसंतनगर शिवारातील वनविभागातील एका हेक्टरची निवड करून शासनाच्या घनवृक्ष लागवड योजनेतून वनराई फुलविण्याचे काम हाती घेतले.
गतवर्षी उन्हाळ्यात या जमिनीवरील दगड, धोंडे बाजूला काढून एक मीटर जमीन खोदली. जून महिन्यात जमीन रोपलागवडीसाठी तयार केल्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात प्रतिचौरस मीटर मध्ये तीन रोपे याप्रमाणे एका हेक्टरमध्ये 30 हजार रोपांची लागवड केली. शेणखत व सेंद्रिय पदार्थांचा वापर करीत कन्हेरवाडी व वसंतनगर तांडा येथील माळरानावर हिरवाई फुलविली. केवळ वृक्षलागवड करून न थांबता या रोपांचे संगोपन करण्याचे नियोजन केले गेले. शेजारील ओढ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यावर मोटार टाकून 700 मीटर पाईपलाईन केली व तेथेच बाजूला विंधनविहीर घेऊन ते पाणी ठिबक सिंचनाद्वारे या रोपांना देण्यात येत आहे.
कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खते व औषधींचा वापर न करता आठ ते पंधरा दिवसांनंतर गोमुत्र, ताक, दशपर्णींचे मिश्रण तयार करून सीपीपी पध्दतीचा वापर करून फवारणी केली. त्यामुळे अवघ्या दहा महिन्यांत ही रोपे सात ते दहा फुटांपर्यंत वाढलेली आहेत.
वृक्ष लागवड संवर्धन चळवळीच्या माध्यमातून आनंदधाम येथील 1200 झाडांचे संवर्धन करण्यात आले.
उजाडलेल्या या डोंगरमाथ्यावर सध्या ही वनराई हिरवळीसारखी दिसत आहे.
साठ प्रजातींची लागवड

वसंतनगर,कन्हेरवाडी,रेवली व परळी रेल्वे स्टेशन येथील घनवृक्षवाटिकेत कडूनिंब,वड,पिंपळ,उंबर,करंजी,बेहडा,बाबळा,लक्ष्मीतरू,आंबा,आवळा,चिंच,सागवान,बदाम, आदि 60 प्रकारच्या देशी-विदेशी वृक्षांची लागवड केलेली आहे.संगोपनामुळे अवघ्या एका वर्षात याठिकाणी घनदाट जंगल पाहवयास मिळत आहे.
55-60 लाख लिटरचे शेततळे याठिकाणी निर्माण केले असून तीव्र उन्हाळयात पाणी कमी लागावे म्हणून संपूर्ण जमिनीवर पाचट व वाळलेल्या गवताचे आच्छादन केले आहे.हरीण व रान डुकरांपासून नुकसान होवू नये यासाठी संपूर्ण रोप वनास तारेचे कुंपण टाकण्यात आले आहे.
वैद्याचा नाथ प्रभू वैद्यनाथाची परळी ही भूमी असून याठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दुर्मीळ आयुर्वेदिक वनस्पतीसाठी स्वतंत्र उद्यान तसेच वन व सामाजीक वनीकरण विभागाद्वारे निर्माण केलेली डेन्स फॉरेस्टची ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर