बीड मध्ये प्रथमच शिशु विकास योजनेच्या कामास सुरुवात परळी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी संपर्क करा- भगवान ढगे

परळी (प्रतिनिधी )-: शिशु विकास योजना हि  A3N IT Services, Gaziabad, 201005 Uttar Pradesh  या कंपनी मार्फत C.S.R. निधी अंतर्गत  संपुर्ण भारत देशात सुरु करण्यात आली आहे. सद्य स्थितीत कंपनी सोबत ९०७ NGO  काम करत आहेत. देशातील गरीब, वंचित ग्रामीण मुलांना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा देण्यासाठी C.S.R. शिशु विकास योजना आपल्या देशात सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक मुलास अडीच लाख रुपये आरोग्यासाठी , उच्च शिक्षणासाठी प्रत्येक मुलास  5 lakh लाख रुपये , आयुर्विमासाठी प्रत्येक मुलास अडीच लाख रुपये सुरक्षा दिली जाईल.
या योजनेंतर्गत सी.एस.आर. हा निधी 20 कोटी गरीब, वंचित ग्रामीण मुलांना आरोग्य, जीवन आणि शिक्षणामध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करेल  असा मानस कंपनी चे डायरेक्टर श्री. नीरज कुमार यांनी व्यक्त केला आहे. देशातील गरीब मुलांना शाळेत जाण्यासाठी शिशु विकास योजना 2019 सुरू केली गेली आहे. C.S.R. शिशु विकास योजनेंतर्गत 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणासाठी  आर्थिक मदत पुरवते. या योजनेंतर्गत आपल्या मुलांसाठी लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या पालकांना शिशु विकास योजना 2019 अंतर्गत अर्ज करावा लागेल.
गरीब व असुरक्षित गटांवरील आर्थिक भार कमी करणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळविणे याची खात्री करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे या योजनेच्या माध्यमातून गरीब मुलांना उच्च शिक्षण प्रदान करणे आणि वंचित ग्रामीण मुलाच्या आरोग्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. 

       यामध्ये शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी.
1. इ.सहावी  Rs. ३०००/- 
2. इ.आठवी  Rs.५०००/- 
3. इ.दहावी  Rs.७०००/-
4. इ.बारावी Rs.८०००/- 

वरिल प्रमाणे प्रवेश घेतलेल्या मुलींना रक्कम मिळणार असुन
 सदारील मुलीचे वय २१ वर्षे पुर्ण झाल्यावर  व्यवसायासाठी साठी दोन लाख रूपये मिळतील
           शिशु विकास योजना २०19 (पात्रता) ची कागदपत्रे या योजनेअंतर्गत मुलाच्या नाव नोंदणीसाठी कौटुंबिक उत्पन्न  5 लाखांपेक्षा कमी असावे.सर्व शालेय विद्यार्थी या योजनेत नावनोंदणी करू शकतात.आरोग्य विम्याचे लाभ मिळविण्यासाठी  बँक खाते जोडा आणि KYC पूर्ण करा.आधार कार्ड,मिळकत प्रमाणपत्र,ओळख प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते पासबुक या कागद पत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांना करावी लागेल. अधिक माहिती साठी कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळhttps://pmsvy-cloud.in/ भेट देऊ शकता आहे.महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून VASRO Ventures pvt. ltd. या कंपनी ची नियुक्ती करण्यात आली आहे तर बीड जिल्हा  समन्वयक  म्हणून श्री. भगवान ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच उर्वरित बीड मध्ये तालुका समन्वयक  म्हणून काम करण्यासाठी इच्छुक संस्था व कंपनी यांनी  श्री. भगवान ढगे मो: 9403049444  आय. सी. आय.सी. आय बँक च्या बाजूस, परळी वैजनाथ, जि. बीड येथे संपर्क साधावा असे आव्हान केले आहे

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला