अशोक नगर भागातील सिमेंट रस्ते, नाल्याची कामे करण्याची निवेदनातून मागणी


परळी (प्रतिनिधी) -: परळी येथे अशोक नगर  भागातील रोडवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.भागातील नागरिकांनी एकञ येऊन   दि.२२/रोजी परळी नगर परिषदेला निवेदनाद्वारे सिमेंट रस्ता व नाली व स्वच्छतेसाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

   भागांमध्ये गेली अनेक वर्ष रोड चे कामे झाले नसून पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये नागरिकांना रस्त्याच्या नाल्याच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या घरासमोर पावसाच्या पाण्याचा ढव साचत आहे यामुळे आपापसात भांडण तंटे होता आहेत. 

 सध्याच्या पावसाच्या पाण्याचा ढव चिखल कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.  भागातील नागरिकांना कामाला जाता व येता वेळी पाण्याच्या ढवातून व चिखलातून येणे-जाणे करावे लागत आहे. व तसेच या भागातील महिलांना पाणी भरण्यासाठी व सार्वजनिक सौचालय ला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
 परळी नगरपरिषदेला  सम्राट अशोक नगर मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले परळी नगरपरिषदेने व संबंधितांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी सम्राट अशोक नगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

परळी तालुक्यात आज परत नव्याने 14 कोरोना पॉझिटिव्ह