परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कन्टेनमेंट झोन शिथील - जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड, (प्रतिनिधी) दि.२६ :- परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९)रुग्ण  पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती.  शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे. यामुळे परळी शहरातील माधवबाग-शारदा नगरचा भगवान बाबा चौक अश्रुबा मुंडे यांचे टी हाऊस पर्यंतचा भाग येथील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर