कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अपुऱ्या सुविधांमुळे,वंचितनेअधिकाऱ्यांना धरले धारेवर


कल्याण,(प्रतिनिधी) दि.२४ -:अपुऱ्या सुविधांमुळे कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुक्मिणी रुग्णालयात वेंटिलेटर व बेडची संख्या वाढवावी, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वाढ तयार करण्यात यावा, टेस्ट लॅबची संख्या वाढविण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे विभागाच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्याच्या गैरसोयींमुळे सामान्य व्यक्तींचे अतोनात हाल होत आहे. कल्याणच्या रुक्मिणी रूग्णालयात व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्यात यावे, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करावा. कोविडच्या टेस्टसाठी लॅब वाढवाव्यात.  पालिका रुग्णालयात कर्मचारी व  रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष माया कांबळे, नितीन वानखेडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे यांच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर