संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेच्या वतिने दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या योद्धांचा सत्कार



परळी वै.(प्रतिनिधी)-: परळी शहरातील वडसावित्रीनगर भागातील संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेच्या वतिने दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिस अधिकारी व इतर योद्धांचा सत्कार करण्यात आला.
परळी शहरालगतच्या  मौजे वडसावित्री विभाग येथील नागरिकांनी दारु बंदी साठी मा,पोलीस अधिक्षक कार्यालय बीड,परळी शहर पोलीस स्टेशन परळी वैजनाथ, आणि संस्थेचे अध्यक्ष ,यांच्या कडे अर्ज करून पायबंद करण्यात यावे यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची तात्काळ दखल घेऊन गेल्या एक महिण्यापासुन परळी शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली (वडसावत्रीनगर) येथे बंदोबस्त ठेवुन गैर मार्गाने गावठी दारु विक्री करत होते त्यांच्यावर कडक कारवाई करून मा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखली पी.आय.गरड, ए.पी.आय.एकसिंगे, ए.पी.आय.जाधव मॅडम, चट्टे, भास्कर, चव्हाण , सिरसाठ, इंगवे, केंद्रे, लांडगे, घुमरे यांनी गेल्या एक महिन्यापासुन वडसावित्री विभाग येथे कोराना काळात पोलीस बंदोबस्त ठेवुन येथील नागरीकांची काळजी घेण्यात आली. त्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.गंगाधर शेळके, उपाध्यक्ष वैजनाथ सोळंके, वैजनाथ भास्कर, संचालक सुभाष नानेकर, दिनेश कापसे, गणेश गवळी, आणि स्थानिक सभासद , महिला सभासद यांच्या वतीने सत्कार करुन, फुल उधळुन सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला