परळीच्या मुलीची बारावी परिक्षेत तेलंगणा राज्यात उत्तुंग भरारी दिव्या महादेव नंदिकोले हिचे सर्वत्र कौतुक


परळी वै.(प्रतिनिधी) -: एच.एस.सी बोर्ड परीक्षेत तेलंगना राज्यातील  हैदराबाद येथील आयडियल कॉलेज येथे परळीच्या दिव्या महादेव नंदिकोले रा.विद्यानगर याने 470 पैकी 461 गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. आयिडयल कॉलेजमधून ती सर्वप्रथम येण्याचा बहुमानही तिने प्राप्त केला आहे. कु.दिव्या नंदिकोले हिने परळीचे नाव हैद्राबाद (तेलंगणा) राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील विद्यानगर भागातील रहिवाशी असलेले महादेव दत्तात्रय नंदिकोले यांची मुलगी कु.दिव्या हिने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील दिलसुखनगर येथे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती. तिने या परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. इयत्ता बारावीत तिने 470 पैकी 461 गुण घेवून यश संपादन केले आहे. इंग्रजी विषयात तिला 95, गणित 73, फिजीक्स 60, संस्कृत 99, गणित भाग 2 मध्ये 75 तर केमिस्ट्री विषयात 59 गुण मिळविले आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर