लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळी ऑनलाइन पद्धतीने सहभागी.

सिल्लोड/प्रतिनिधी: नवरी नवरदेव लग्न मंडपात तर शिक्षक ,मिञ मंडळी मात्र आपापल्या घरूनच विवाह सोहळ्यात सहभागी झाले. लाॅकडाऊन मध्ये  शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून नवरी नवरदेवाचे आई वडील चुलते घरातील मंडळी ज्येष्ठांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. 

               सिल्लोड तालुक्यातील  टाकळी जिवरग येथील वर समाधान तुकाराम फुके यांचा सिल्लोड तालुक्यातीलच वधू शेजल (राणी) विठ्ठल शेजुळ हिच्यासोबत रविवार दि :७ जून १२:३५ रोज राहत्या घरी विवाह  सोहळा संपन्न झाला. त्यांची लग्नाची तारीख ठरलेली होती. कोरोना लाॅकडाऊनमुळे औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने नातेवाईक मित्रमंडळी बाहेर जिल्ह्यातून लग्नाला येण्यास परवानगी मिळत नव्हती. 
मित्र तुषार सोनवणे, नारायण बावले ,अमोल फुके यांनी पुढाकार घेत आॅनलाईन पद्धतीने लग्नात नातेवाईक मित्रमंडळी सहभागी करून घेण्याची कल्पना वधू-वरांच्या आई-वडिलांकडे मांडली व त्यांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार सर्वांचा साक्षीने पारंपारिक पद्धतीने पार पडला. 

             वऱ्हाडी मंडळी zom app  लाईव्हद्वारे पहिला सोहळा नवरदेव नवरी मोबाईल मध्ये दिसत नवरदेवाने नवरीच्या गळ्यात मनी मंगळसूत्र पुष्पहार , नवरीने नवरदेवाला पुष्पहार  घातला. वऱ्हाडी मंडळीनेही आपाआपल्या घरून zom app व कॅालिंग, फेसबुक लाईव्हव्दारा लग्नाचा सोहळा पाहत आनंद घेतला व वधू-वराला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्तु फुके, हरि शेजुळ, संतोष खटाळ, राजेंद्र आहेर, योगेश भावले यादी उपस्थिती होते. यावेळी शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून सुरक्षित अंतर राखून मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत  या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला