परळी नगरपालिकेने रमाई घरकुल योजनेतील मंजूर लाभारथिस पाच बरास वाळु, विधुत मिटर,व गॅस कनेक्शन देण्यात यावे - बालासाहेब जगतकर

परळी (प्रतिनिधी) -: परळी नगरपालिकेने मंजुर लाभारथिस पाच बरास वाळु,विधुत मिटर व गॅस कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा  तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.                         

 याबाबत सविस्तर माहिती अशी कि शासनाने मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या स्तर उचावणयासाठि व त्यांच्या निवारयाचा प्रश्न सुठावा म्हणुन रमाई घरकुल योजनेतील मंजूर लाभारथिस शासनानेच घरकुल बांधण्यासाठी रास्त भावात पाच बरास वाळु देणे तसेच घरकुल पुर्ण झाल्यास घरात विधुत मिटर बसवून देणे व घरात धुर होऊ नये म्हणुन गॅस कनेक्शन देणे येवढे असताना देखील आतापर्यंत कुठलेही साधणे दिले नाहीत.तसेच ज्यांची  घरकुल मंजुर असुन ज्यांचे धनादेश तयार आहेत त्यांनाही एक लाखाचा धनादेश देण्यात यावे.  यासाठी लवकरात लवकर वरील साहित्य पुरवठा करण्यात यावे अशी लेखी मागणी येथील मुख्याधिकारी नगर परीषद परळी,तहसीलदार साहेब,जिल्हाधिकारी साहेब,व समाज कल्याण आयुक्त बीड ईतयादिना शासन आदेशाच्या प्रति सह निवेदने दिली असुन त्याची लवकरात लवकर पुर्तता करणयात यावी.अन्यथा १५ ऑगस्ट पासुन परळी नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसण्यात येईल असे लेखी निवेदन दिले असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर