परळीच्या कोरोना बाधित महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू !


बीड -(प्रतिनिधी) -: औरंगाबाद येथे उपचार सुरू असलेल्या एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .या महिलेवर गेल्या आठ दहा दिवसापासून उपचार सुरू होते .या महिलेच्या मृत्यमुळे आता कोरोना बाधित होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा चार झाला आहे .

परळी येथील एका 58 वर्षीय महिलेला किडनी आणि इतर उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले होते,तेथेच या महिलेवर उपचार सुरू होते, दरम्यान गुरुवारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .यापूर्वी कोरोनामुळे जिल्ह्यातील तीन जणांचा मृत्यू झाला होता आता त्यात एकाची भर पडल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या चार झाली आहे .
बीड जिल्ह्यातील परळी येथील 58वर्षीय महिला कोरोना बाधित आढळली होती या महिलेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे दोन दिवसापूर्वीच केज तालुक्यातील एका महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता बीड जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे
सदरील महिलेस मधुमेह किडनी निमोनिया असे आजार होते उपचारासाठी गेल्यानंतर या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता बीड जिल्ह्यात काम आढळलेल्या पाच कोरोना बाधित रुग्णांमुळे 95 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली आहे यामध्ये 71 जणांनी कोरोनावर मात केली आहे 

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर