दिलासा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह


 
बीड (प्रतिनिधी)-: जिल्ह्यातील आज एकूण 136 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी अगोदर 93 स्वॅब निगेटिव्ह आले होते. उर्वरित स्वॅब देखील आता निगेटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली आहे.
दरम्यान, आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती खालीलप्रमाणे
जिल्हा सामान्य रुग्णालय-49, सी. सी. सी. बीड-23, स्वा. रा. ती. ग्रा. वै .म.अंबाजोगाई-18, सी. सी. सी. आंबाजोगाई-11, उपजिल्हा रुग्णालय केज-1, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-2, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-4, उपजिल्हारुग्णालय, परळी-28 असे एकूण 136 स्वॅब घेण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर