गरजवंतांच्या मदतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे APJ ग्रुप कार्यरत
परळी वै.(प्रतिनिधी) -: गेल्या चार पाच दिवसांत शहरात अचानकपणे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या परिस्थितीत प्रशासन पूर्ण जोर लावून काम करत आहे. पण, सर्वबाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे हे त्यांच्यावर काहीसे अन्यायकारक ठरेल. जनतेच्या मदतीशिवाय कुठलेच प्रशासन काही करू शकत नाही. या अनुषंगाने शहरात Action Protection Junction (APJ) समूह कार्यरत झाला आहे अशी माहिती समूह समन्वयकांनी दिली आहे.
सध्या आपल्या परळी वैजनाथ शहरात आपण सर्वांनी एकमेकांसाठी उभे राहणे अत्यावश्यक आहे. कोरोना येईल अन जाईल पण आपल्यातील माणुसकी अबाधित राहणे गरचेचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांना मदत करत राहू तोपर्यंत टिकून राहू मग तो व्यापार असेल परिवार असेल किंवा समाज.
याच भावनेतून Action Protection Junction (APJ) संकल्पना तुमच्या आमच्यासाठी राबवत आहोत. या कोरोनाकाळात आम्ही अडचणीत असलेल्या व्यक्तींचे प्रश्न यथाशक्ती सोडवण्यासाठी प्रयत्न करू. काहीही अडचण असली तरी निःसंकोचपणे कळवा आम्ही प्रशासनाच्या सहाय्याने सोडवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू. यासाठी कोणतेही पैसे किंवा खर्च लागणार नाही असे APJ समूह समन्वयकांनी सांगितले.
आवश्यक प्रश्नांवर Action घेऊन आपल्या सर्वांच्या Protection चे हे एक तुमच्या हक्काचे Junction असेल. विचार व कृती सकारात्मक / Positive ठेवू आणि कोरोना Negative राहू. ज्यांना आपल्या मातृभूमी, पितृभूमी, कर्मभूमी, पुण्यभूमी विषयी थोडीशी जरी आपुलकी असेल ते सगळे सुजाण नागरिक या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास APJ समूह समन्वयकांनी व्यक्त केला.
चौकट
साथी हाथ बढ़ाना
साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिल कर बोझ उठाना,साथी हाथ बढ़ाना. म्हणूनच या कार्यात आम्हांलाही तमाम परळीकरांच्या सहकार्याचा आशीर्वाद व प्रशासनाची साथ अपेक्षित आहे असे आवाहन APJ समूह समन्वयकांनी केले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
9822576003
9823775044
8983555657
Comments
Post a Comment