भागवताचार्य श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्ञी करणार "झी टाॅकिजवर गजर कीर्तनाचा "
परळी (प्रतिनिधी) -: येथील श्री संत जगमित्र नागा महाराज मंदिर या ठिकाणी चित्रीकरण झालेल्या कीर्तन सेवा झी टॉकीज या लोकप्रिय चैनल वरून प्रसारित होत आहेत यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा संपन्न झालेल्या आहेत. भाविकांनी या सर्व कीर्तन सेवांना भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे.
या किर्तन मालिकेचे विशेष आकर्षण म्हणजे श्री ह भ प डॉ तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आहेत परळी आणि परळी तालुक्यातील भाविकांना ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या कीर्तनाची अतिशय आवड आहे झी टॉकीज चे चित्रीकरण झाले तेव्हापासून परळी परिसरातील भाविक तुकाराम महाराजांचे कीर्तन कधी दिसणार आहे अशी आवर्जून चौकशी करत आहेत. वृत्तपत्रातून बातम्या प्रदर्शित झाल्यानंतर पानेगावकर महाराज साठे महाराज यांची कीर्तने भाविकांनी पाहिली आणि ती कीर्तने संपताच आपल्या तुकाराम महाराज मुंडे यांचे कीर्तन कधी लागणार आहे असे आवर्जून फोन करून मेसेज करून विचारत असतात. परळी परिसरातीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेले नामवंत कीर्तनकार श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री लवकरच झी टॉकीज वर आपल्या 4 कीर्तन सेवा घेऊन येत आहेत दिनांक 20 जुलै ते दिनांक 23 जुलै अर्थात सोमवार ते गुरुवार या चार दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ या वेळेत झी टॉकीज चैनल वरून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कीर्तन मालिकेत श्री ह भ प तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या चार कीर्तन सेवा प्रसारित केल्या जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून, शासनाने घालून दिलेल्या नियमात राहून, किर्तनाला एकही श्रोता न बसवता, मोजक्याच टाळकरी यांना उभे करून कीर्तन मंडप तीन वेळा सॅनीटाइज करून सदरील कीर्तनाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. महाराजांनी सुद्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक विचारांची निर्मिती भाविकांच्या मनात कशी करता येईल याचा विचार करूनच विचार मांडलेले आहेत. कोरोणावर कशी मात करता येईल आणि यापुढे जीवनाची वाटचाल कशी आपल्याला ठरवावी लागेल याचे सुंदर मार्गदर्शन प्रस्तुत चा कीर्तन सेवा मधून झालेले आहे. आनंदी जीवनाची सूत्रे काय असतात याचा सांगोपांग विचार महाराजांनी कीर्तनातून मांडलेला आहे तरी महाराष्ट्रातील तमाम भाविकांनी दिनांक 20 जुलै पासून सलग चार दिवस महाराजांच्या कीर्तन सेवेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन झी टॉकीज परिवार, अखिल भारतीय वारकरी मंडळ, विश्व वारकरी सेना; अखिल वारकरी संघ ,अखिल भारतीय वारकरी महासंघ आणि संप्रदायातील बऱ्याच संघटनांनी केले आहे
महाराजांच्या कीर्तनाला गायन साथ भजन सम्राट कैलास महाराज पोळ, संगीत अलंकार मोतीराम महाराज मोहिते, संगीत आलंकार गोविंद महाराज शिरसाठ, उद्धव महाराज भोजनकवाडीकर, युवा कीर्तनकार जगदीश महाराज सोनवणे, राजाभाऊ महाराज मांडवेकर; कैलास महाराज मुरकुटे यांचे लाभले असून, मृदंगसाथ तालरत्न भरत महाराज सोडगीर, मृदंग अलंकार सुदर्शन जोगडे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे; संगीत विशारद वल्लभ कातकडे यांची लाभली आहे किर्तन साथीसाठी प्रकाश महाराज फड, संग्राम महाराज फड ,तळेगावकर भजनी मंडळ, इंदपवाडीकर भजनी मंडळ, कासरवाडीकर भजनी मंडळ, टोकवाडीकर भजनी मंडळ बेलंबकर भजनी मंडळ इत्यादी भजनी मंडळ यांची उपस्थिती लाभलेली आहे मंदिराचे पुजारी उदय औटी यांची विना घेण्यासाठी उपस्थिती लाभलेली आहे. दिनांक 20 पासून प्रसारित होणाऱ्या कीर्तन सेवांचा लाभ परळीकर यांनी घ्यावा असे आवाहन मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी यांनी केले आहे
Comments
Post a Comment