लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरातही अनेक कार्यक्रम राबविण्यात आले


परळी (प्रतिनिधी) -: मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नवजात मुलींचा दर वाढवा यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या.आजही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवित आहे. 
    मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी उपजिल्हा रुग्णालयात 26 जुलै रोजी 24 तासात जन्म घेणाऱ्या मुलींना पायातील चांदीचे वाळे,हातातील चांदीचे कडे व जन्मदात्या आईस साडी चोळी तसेच जन्मदात्या पित्यास वृक्ष भेट देण्यात येत असून प्राथमिक स्वरूपात सौ.भाग्यश्री कृष्णा परिहार यांनी गोंडस मुलीला जन्म दिला या मुलीस पायातील चांदीचे वाळे,चांदीचे हातातील कडे व जन्मदात्या आईस साडी चोळी तसेच जन्मदात्या पित्यास मुलीच्या नावाने वृक्ष भेट देण्यात आले.
    परळी शहरात योगेश पांडकर यांनी आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे.या कार्यक्रमाची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
  या कार्यक्रमावेळी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सदस्य ऍड.अरुण पाठक, सौ.सुचिताताई सचिन पोखरकर,सौ.आश्विनी योगेश पांडकर,भाजयुमोचे विजय दहिवाळ, नितिन मुंडे,गोविंद मोहेकर,सुधाकर गित्ते,शाम गित्ते,राम गित्ते आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर