थर्मल मधील निवृत्त कर्मचारी अंबादासराव देशमुख यांचे निधन


परळी वै.(प्रतिनिधी) -: येथील थर्मल पॉवर स्टेशन मधील निवृत्त कर्मचारी अंबादासराव एकनाथराव देशमुख यांचे काल बुधवार दि.२९ रोजी रात्री १०.३० वा सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते.शक्तीकुंज वसाहतीतील श्रीराम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान होते. सुधाकर,रत्नाकर, प्रभाकर देशमुख यांचे ते वडील होत.

शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी असलेले थर्मल पॉवर स्टेशन मधील निवृत्त कर्मचारी तथा प्रतिष्ठीत नागरिक अंबादासराव एकनाथराव देशमुख यांचे बुधवारी रात्री निधन झाले.अतिशय मनमिळाऊ ,संयमी धार्मिक स्वभावामुळे ते सर्वदूर परिचित होते.त्याच्या पश्चात पत्नी, ३ मुले सुने नांतवडे असा परिवार आहे.शहरातील मोक्षधाम स्मशानभूमीत अंबाबदासराव देशमुख यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात दक्ष न्युज परिवार सहभागी आहे.

Comments

Popular posts from this blog

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या - प्रकाश आंबेडकर