डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर झालेल्या तोडफोड केलेल्या आरोपीस तात्काळ अटक करावी या घटनेचा परळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध.
परळी (प्रतिनिधी) -: आज दिनांक ८/७/२०२०रोजी परळी शहर काँग्रेसची तातडीची बैठक वसंतराव मुंडे मोंढा मार्केट परळी येथे बोलण्यात आली या बैठकीमध्ये मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड केलेली आहे या घटनेच्या परळी शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध केला असून तोडफोड करणाऱ्या आरोपीस यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार चे चेअरमन वसंतराव मुंडे ज्येष्ठ नेते गणपत अप्पा कोरे शहराध्यक्ष बाबू भाई नंबरदार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अलताफ परळी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. संजय रोडे परळी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता ताई मुंडे शहराध्यक्ष आशाताई कोरे परळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख जहीर अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष शेख जावेद शहराध्यक्ष शेख सिकंदर अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष महादेव तर कसे गुलाब देवकर शहर उपाध्यक्ष अमर सूर्यवंशी शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment