' मोक्का' ची प्रकरणे आता जिल्हा न्यायाधीश चालविणार( डी जे-1व डी जे-2 यांना अधिकार केले प्रदान )अॅड. रणजित वाघमारे अतिरिक्त सरकारी वकील माजलगाव यांची नियुक्ती
सध्याते माजलगाव येथे अतिरिक्त सरकारी वकील म्हणुन काम करत आहेत, तेथे त्यांच्या कामाची नेहमी प्रशंसा ऐकण्यात आली आहे. ते योग्य न्याय या पदाला देतील. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोका (MOCCA)कायद्याच्या अंतर्गत येणारी प्रकरणे आता राज्यातील प्रत्येक जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील .आतापर्यंत हे खटले केवळ विशेष न्यायालयात चालविली जात असत.
संघटित गुन्हेगारी वर नियंत्रण मिळविण्यासाठी 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा( Maharashtra Control Of Organised Crime Act ),1999 अस्तित्वात आला होता. हा कायदा ' मोक्का ' या नावाने ओळखला जातो. राज्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीवर व प्रामुख्याने त्या काळात वाढलेल्या आतंकवादी कारवायांविरोधात हा कायदा तत्कालीन शिवसेना-भाजपा राज्य सरकारने आणला होता.
अलीकडेच यासंदर्भात राज्य सरकार व मुंबई उच्च न्यायालयाने एकमताने असे खटले चालविण्याचे अधिकार त्या त्या जिल्हा न्यायालयाना बहाल केले आहेत.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातील मोक्का खटले आता संबंधित जिल्हा न्यायाधीश-1व जिल्हा न्यायाधीश-2 ह्यांच्या न्यायालयात चालतील.
यानिमित्ताने जिल्हा स्थळावर फॊजदारी स्वरूपाचे खटले चालविणाऱ्या वकिलांना एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.
Comments
Post a Comment