परळी शहर पोलीस स्टेशन समोर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. आत्मदहन करणार - पत्रकार सुकेशनी नाईकवाडे.


परळी(बीड):- परळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी पत्रकार सुकेशनी नाईकवाडे व त्यांचे सहकारी  व्हिडिओ जर्नालिस्ट संजीब रॉय यांना वारंवार जाणून बुजून टार्गेट करीत सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्या गेले . बातमी च्या अनुषंगाने गेले असता त्यांना अपमानित करून हाकलून दिल्या गेले.
महिला पत्रकार यांच्याशी ते अश्लिल वर्तन करून सार्वजनिक ठिकाणी त्यांना अपमानित करण्यात आले, या घडलेल्या प्रकारच्या अनुशंगाने पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांनी बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना तब्बल तीन वेळा लिखित तक्रारी सुद्धा दिल्या असल्याचे त्या म्हणाल्या असून अध्यप या अधिकाऱ्यावर  गुन्हा दाखल झाला नसल्या कारणावरून मला माझ्यावर होत असलेल्या अन्यायाच्या व मानसिक त्रासाच्या  विरोधात हे अतिशय टोकाचे पाऊल उचलण्यास हे प्रशासन मजबूर करत आहेत असे त्या म्हणाल्या.
पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कनिस्ट अधिकाऱ्यांच्या चुकांवर पंगरून घालण्याचे काम करत असल्याचे समोर येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
जनसामान्यांच्या प्रश्ननाना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतो, लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून या माध्यमाकडे पाहिले जाते.
आणि याच आधार स्तंभाला त्याच्या कार्या पासून दूर करण्यासाठी मजबूर या प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे.
पोलीस निकीक्षक हेमंत कदम वर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही? तर मला माझ्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात हे टोकाचे पाऊल उचलण्यास मजबूर केल्या जात असून याचे जबाबदार बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार व संबंधित अधिकारी  असणार असे निवेदनात पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांनी म्हटले आहे.
या बाबद आज निवेदन मेल द्वारे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व संबंधित सर्व कार्यालयास पाठवण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला