मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे
परळी (प्रतिनिधी) -: मनुवाद्यांनो 'राजगृह' ही नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून आरोपींचा तपास करून या पाठीमागे ज्यांचे कुणाचे शर्यत असेल त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करवी अशी मागणी 'भीम आर्मी' सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक संजय पाडमुखे यांनी केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ ही फक्त इमारत नसून आंबेडकरी, मानवतावादी चळवळीला लागणाऱ्या सामाजिक, वैचारिक ,राजकीय, पिढी घडवण्याची साहित्याची निर्मितीची खरी ऊर्जा आहे.या निवासस्थान काल झालेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विचार आज सुद्धा आधुनिक भारत घडवण्यासाठी जनमनात तळागाळात रुजलेले आहेत.त्यामुळे कोणतीही विघातक मनोवृत्ती हे विचार जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत. तोपर्यंत आबाधित आहे...
Comments
Post a Comment