डिजिटल ऑनलाइन पद्धतीने "मेरा भारत - माझा अभिमान" या देशभक्तीपर उपक्रमातून तुलसीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन....
तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे संस्थेचे संस्थापक तथा संचालक प्रा. प्रदिप रोडे यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत माननीय प्राचार्या उमा जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा 15 ऑगस्ट 2020 - "स्वातंत्र्य दिन" हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला...
यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हा विद्यार्थ्यांनी घरातच राहून ऑनलाइन पद्धतीने साजरा केला....
यात विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने वेगवेगळ्या विविध कलागुणांना सादर करण्याची संधी मिळाली.. ज्यात देशभक्तीपर गीत गायन, रांगोळी, नृत्य, चित्रकला, भाषण, आधुनिक देशभक्तीपर रॅप गीत, अभिनय, मेहंदी काढणे, फॅन्सी ड्रेस आदी माध्यमातून आपली कलागुण सादर करण्याचा आणि देशाला अभिवादन करण्याचा विशेष अभिमान मिळाला...
ज्यातून विद्यार्थ्यांना देश कळाला या ऑनलाईन सांस्कृतिक उपक्रमांत जवळपास शाळेतील पावणेदोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व एक विक्रम केला. ..
ज्यात नर्सरी ते दहावी मधील विद्यार्थी सहभागी होते.खरंच या लॉकडाऊन च्या काळा मध्ये देशाला अशा प्रकारे अभिवादन करण्याची एक वेगळीच पण उत्तम संधी सर्वांनाच विद्यार्थ्यांना लाभली..
या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे व प्राचार्यां उमा जगतकर कौतुक केले व हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व शिक्षक वृंद कर्मचाऱ्यांचे यांचे अभिनंदन केले...
Comments
Post a Comment