बालासाहेब इंगळे यांच्या निवेदनाची ना.धनंजय मुंडे यांनी घेतली दखल


परळी (प्रतिनिधी) -: जुनी पेन्शन कोअर कमिटी औरंगाबाद विभाग व बीड जिल्हा यांच्या वतीने बालासाहेब इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व 10 जुलै 2020 ची अधीसुचना रद्द करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांनी याबाबत योग्य कार्यवाही करावी यासंदर्भात सांगितले आहे

एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर प्रशासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात संघटनेच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते

या निवेदनाची दखल घेत ना. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना योग्य ती कार्यवाही करावी व निर्णय घ्यावा अशा प्रकारची शिफारस केली आहे यामुळे संघटनेच्यावतीने ना.धनंजय मुंडे यांचे आभार मानण्यात येत असल्याचे बालासाहेब इंगळे,मधुकर घुगे,चंद्रकांत गायकवाड, संजय इंगळे,मदन कराड,श्रीहरी दहिफळे,विलास धीमधीमे,बन्सी पवार,गोरखनाथ राऊत,बाळासाहेब धनवडे,बशीर सायद,नामदेव तुतारे, पांढरे,रांजवन, गांगले,सचोन पवार  यांनी म्हटले आहे

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर