पंढरपूरला हजारोच्या संख्येने जाणार - जोगदंड,सरवदे
बीड(प्रतिनिधी) अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिथर प्रवेश आंदोलन करण्यात येत आहे कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार ते पाच महिना पासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना हजारो वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत.
बीड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत मंदिर भक्तासाठी खुलं करावं या आंदोलनासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याठिकाणी हजारोच्या संख्येने वारकरी यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी पंढरपूर या ठिकाणी जाणार असल्याचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष जोगदंड व जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय सरवदे कळविले.
Comments
Post a Comment