शिवसेना सामाजिक कार्यात सतत पुढे असते - अभयकुमार ठक्करउद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त सँनिटायझर वाटप


परळी (प्रतिनिधी) -: शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे धोरण 80% समाजकारण आणि 20% निश्चित करून दिल्याने शिवसेना सामाजिक कार्यात सतत पुढे असते असे मनोगत  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसचे औचित्य साधुन शहरातील रस्त्यावरती बसून  व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना सँनिटायझर वाटप प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व शहरात कोरोना पाॅझीटीव रुग्णांची वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना परळी वैजनाथ मा.उपशहर प्रमुख सतिष जगताप यांनी शिवसेना मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव,शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत  

परळी वैजेनाथ शहरातील रस्त्यावरती बसून छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना सँनिटायझर वाटप करण्यात आले.या वेळी पत्रकार संतोष जुजगर, शिवसेना विभाग प्रमुख संजय सोमाणे,भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख मोहन परदेशी,शहर प्रमुख,गजानन कोकिळ,वैभव जगताप, राहुल गडेकर, योगेश घेवारे वैजेनाथ शिंदे, परमेश्वर सावंत हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर

कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही - प्रो.डॉ. शंकरराव अंभोरे

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर हिरवाईने नटला