एकाच घरात दोन घरकुल मंजुर करणार्या ग्रामसेवक व सरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करूण ग्रामसेवकाला निलंबीत करा - युनुस शेख
बीड (प्रतिनिधी) दि.21 बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील खेेड्यागावात एकाच घरात दोन वेळा घरकुल मंंजुर करण्याचे काम सरपंचा सोबत संगणमत करूण ग्रामसेवक करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीडचे तालुकाध्यक्य युनुस शेख यांनी केला आहे.खेड्यागावात अनेक कुटुंब हे शासनाच्या घरकुल योजने पासुन वंचित असुन गोर गरीब कष्टकरी,शेतमजुरांना अद्याप हि लाभ मिळालेला नाही.सरपंच व ग्रामसेवक गावातील जवळच्या व संपर्कातील लोकांकडुन चिरी-मिरी घेऊन एकाच घरातील दोन व्यक्तींना घरकुलाचा लाभ देत असुन या मध्ये सर्व सामान्य कुटुंबीयांना मात्र घरकुला पासुन बेघर व्हावे लागत आहे.तरी सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे गोर गरीब नागरकांची दयनिय अवस्था होत आहे.तरी मुजोर ग्रामसेवकाच्या आडमुठ्या धोरणाचा जिल्हाधिकारी बीड यांनी समाचार घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करूण अशा बेजबाबदार ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी व सर्वसामान्य नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडी बीड तालुक्याच्यावतीने बेजबाबदार ग्रामसेवकाच्या चुकीच्या धोरणा विरूद्ध तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांना मागणी केली असल्याचे हि वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुकाध्यक्ष युनुस शेख यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment