मा.ना.धनंजय मुंडे यांनी इराणी वस्ती येथे दिलेल्या शब्दाची केली पूर्तताप्रभाग क्र.९ मधील राहिलेल्या कामांची लवकरच सुरुवात - किशोर पारधे (नगरसेवक तथा स्वच्छता सभापती)


परळी (प्रतिनिधी) -: महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे यांनी इराणी वस्ती मधील मस्जिद समोर इराणी समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत मा.वाल्मिक अण्णा कराड न.प.गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या टाकी व लाईटचे हायमास्ट बसवून आज वचनपूर्ती केली तसेच लवकरच राहिलेले इतर कामे सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येतील. 
         आज दि.२९/०८/२०२० रोजी मा.वाल्मिक अण्णा कराड न.प.गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली इराणी वस्ती मध्ये बसवण्यात आलेल्या लाईटच्या हायमास्ट चे लोकार्पण करून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उदघाट्न व नवीन शिवाजी नगर येथून इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या सर्व कामाचे उदघाट्न व लोकार्पण कारतांना या भागातील नगरसेवक तथा स्वच्छता सभापती किशोर पारधे, ह.भ.प. भरत महाराज गुट्टे, अक्रम अली (इराणी सरदार) सतीश अण्णा जगताप (शिवसेना नेते), युवा नेते दिनेश गजमल, तालेबसेठ बेग, जहीर बेग, अमोलजी सूर्यवंशी, शुभमजी नागरगोजे, विकास रुपनर, रामभाऊ ढेंगळे, खमर अली, बालाजी आव्हाड, आबासाहेब कांबळे, संतोष वणवे, अब्बास अली, बांगर अली, अमोल शिंदे, हबीब सेठ बेग, खेबर अली, सद्दाम शेख, विक्की जावळे, अमोल कानडेतसेच या भागातील सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल कानडे तर आभार इराणी सरदार अक्रम अली यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर