बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा - अशोक तावरेदोन दिवसात मनसे स्टाईल आंदोलन करणार
बीड (प्रतिनिधी) दि. 24 बीड शहरातील लॉकडाऊन शिथिल झाल्या मुळे काही व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत व सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे मार्केट मध्ये लोक खरेदीसाठी येत आहेत यामध्ये मोकाट जनावरे त्यातील काही वळू लाल वस्त्र परिधान केलेल्या महिलांच्या अंगावर धावून जात आहेत त्यामुळे बाजारात प्रचंड गोंधळ उडतो शहरातील प्रत्येक रस्त्यावर शंभर ते दीडशे च्या वर संख्येने ही मोकाट जनावरे फिरता व काही जनावरे बसलेले असतात त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दोन दिवसात या बाबतीत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी आज नगरपालिक येथे जाऊन मुख्यअधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना निवेदन देन्यासाठी गेले होते परंतु मुख्य अधिकारी हे त्यांच्या कक्षामध्ये उपस्थित नव्हते, हे निवेदन कशप्रमुख यांना दिले, पण त्यांनी सांगितले की मुख्याधिकारी हे पाच सहा महिन्या पासून नगरपालिके च्या कार्यालयाकडे आलेले नाहेत, आपण निवेदन हे आवक-जावक करावे अशी त्यांनी माहिती दिली. मुख्य अधिकारी घरूनच कामकाज पहातात,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्ह्याच्या वतीने या पूर्वी कार्यास दोन-तीन वेळा निवेदन देऊन शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्या बाबत विनंती वजा निवेदन केले होते परंतु नगर परिषदेच्यावतीने यावर कसलीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे मनसे दोन दिवसानंतर मनसे स्टाईल आंदोलन नगर पालिकेत करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे सह जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, उपाध्यक्ष सदाशिव बिडवे, जिल्हा सचिव अशोक सुरवसे तालुकाध्यक्ष श्रीकृष्णा गायके, विशाल शिंदे अनिल जमदाडे, राम पैठणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment