बीडचा आमदार व बीडचा नगराध्यक्ष यांच्या घरापुढे "रस्ता खोदो" आंदोलन करणारः - पँथर धम्मानंद वाघमारे
बीड (प्रतिनिधी) दि.20 बीड शहरातील नाळवंडी रोड प्रभाग क्रमांक 19 व 4 मधील रस्त्याची दुरावस्था अशी झाली आहे की माणूस सोडा जनावरांना देखील या रस्त्यावर चालू शकत नाहीत. आदित्य मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज कडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे, कोरोना रोगामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काही विभाग या भागातच चालू करण्यात आले आहेत जवळचा रस्ता म्हणून शहरातील सर्व भागातील लोक या रस्त्याचा उपयोग करत आहेत वाहतूकीचा असलेला हा रस्ता खड्डे व घाणीचे साम्राज्य झाला असून या भागात राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहे. ये-जा करण्याची देखील हाल होत आहेत, साथिच्या रोगांनी थैमान घातलेला असताना जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष का केले जातेय. जनतेतून निवडून आलेले स्वतःला बीड चे भुषण समजणारे बीडचे नगर अध्यक्ष या भागाचे भुषण म्हणून घेतील का ? असा सवाल मी त्यांना करत आहे!
या भागातील जनतेचे सेवक असलेले प्रतीनिधी आपल्या बंगल्याच्या बाहेर निघत नाहीत आणि प्रभागातिल अडचणी नगराध्यक्षाच्या निदर्शनास आणून देण्याची यांची हिम्मत नाही असा माझा आरोप आहे. हे जनतेचे प्रतिनिधी आहेत का बंगल्याचे गडी. जर दोन दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर लॉकडाउन चे सर्व नियम तोडून प्रभागातील सर्व नागरिकांना घेऊन नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर आणि आमदार संदिप क्षिरसागर राहत असलेल्या बंगल्या समोर रस्ता खोदो अंदोलन करणार असे एका पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना धम्मानंद वाघमारे कळवले आहे.
Comments
Post a Comment