विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वयाच्या पात्रतेच्या अटीत सुट द्या –संतोष शिंदेराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन


परळी वै.(प्रतिनिधी) -:2020 या वर्षात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या स्पर्धा परिक्षा रद्द झालेल्या आहेत किंवा त्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळे संबंधीत परिक्षेस पात्र असलेले वय वर्ष २०२० या वर्षात उलटून जात असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून, ही अट एका वर्षांसाठी शिथील करावी अशी मागणी परळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या आजाराने आंतरराष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. भारतात आणि आपल्या राज्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. करिअरची स्वप्नं उराशी बाळगून हजारो विद्यार्थ्यांनी जीवापाड मेहनत घेऊन परीक्षांची तयारी केली आहे. यातच कोरोनामुळे यंदा काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने वयाच्या अटीच्या पत्रतेत शेवटचे वर्ष असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग तसेच अनेक स्वरूपाच्या परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना वयाच्या अटीच्या पात्रतेचा मोठा फटका बसण्याची यंदा दाट शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे यंदाचे वर्ष अत्यंत खडतर आणि कठीण झाले आहे. स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन वयाच्या पात्रतेची अट एक वर्षे पुढे ढकलण्यात यावी, जेणेकरून अधिकारी होण्याचे स्वप्नं उराशी बाळगलेल्या हजारो सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे नुकसान टळेल. संबंधित विषयाला अनुसरून आपण योग्य अशी कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर