पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून दिले ; परळीचे जलवैभव वाढवले - बाजीराव भैय्या धर्माधिकारी सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत


परळी वै.(प्रतिनिधी) -: परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय मुंडे हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होते. पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी  पूर्ण विराम मिळवून दिला आहे. हे कार्यालय आता परळीत तर असणार आहेच तसेच या कार्यालयांतर्गत तीन जिल्ह्यांचा कारभार चालणार आहे.कार्यक्षेत्र वाढवून परळीचे जलवैभव वाढवले  असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

       राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे.राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्यातील ७ उपविभाग असे ४ विभाग आणि २९ उपविभाग आता परळी मंडळास जोडण्यात आले आहेत.
         जलसंपदा विभागाअंतर्गत परळी तालुक्याचे वैभव वाढवणारा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील , बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे तमाम परळीकर व बीड जिल्ह्यावासियांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर