बीड वंचित बहुजन आघाडी वतीने सेवेतील एसटी वाहक- चालक यांचा सत्कार संपन्नबीड -औरंगाबाद, बीड-नांदेड, बीड-लातूर गाडीच्या चालक- वाहकांचा सत्कार...
बीड (प्रतिनिधी) दि. 20 वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी 12 तारखेला महाराष्ट्रातील सर्व बसस्थानका समोर डफली बजाओ आंदोलन चालू केले होते सार्वजनिक वाहतूक चालू करावी या मागणीची दखल घेत आज राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसेस जिल्ह्या बाहेर चालू केले आहेत याची दखल घेत बीड येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड येथील आगारांमध्ये आगार प्रमुख निलेश पवार, स्थानक प्रमुख किरण बनसोडे आयटीआय संतोष जाधव, मिलिंद ससाने कर्तव्यावर जाणारे वाहक शकील भाई चालक भोसले वाहक गोरे वाहक-चालक व स्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांचे पुष्पहार शाल श्रीफळ पुष्पहार घालून देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडी विधानसभेचे उमेदवार अशोक हिंगे ज्येष्ठ नेते बबन वडमारे, महिला आघाडीच्या नेत्या पुष्पाताई तुरुकमाने, उपाध्यक्ष संतोष जोगदंड, ज्ञानेश्वर कवठेकर,अजय सरवदे, ॲड. सदानंद वाघमारे, बालाजी जगतकर, विनोद तागडे, युनुस शेख आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड बस स्थानकात कर्तव्यावर आलेल्या सर्व वाहक-चालक कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment