शैक्षणिक संघर्ष योद्धा - प्रो. डॉ. शंकर अंभोरे


प्रो.डॉ. शंकर अंभोरे  यांचा जन्म 25 ऑगस्ट 1966 रोजी, वाशीम जिल्हा, रिसोड तालुक्यातील पर्डी तिखे या छोट्याश्या गावी झाला. आपण आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण आपल्या गावी पूर्ण करुन पुढील शिक्षण घेण्यासाठी ज्ञानभूमी म्हणजेच नागसेनवन औरंगाबाद येथे आले असता शिक्षण घेत घेत आपला शैक्षणिक व  सामाजिक संघर्षास सुरुवात झाली. आपण आपले पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून पूर्ण करून पुढील पदव्युत्तर शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र या विषयात पूर्ण केले. पुढे आपण एम.ए. अर्थशास्त्रात एम. फिल. व पी. एच. डी. चे शिक्षण पूर्ण केले.आपली 1992 या वर्षी जालना येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली व आपण मागील 28 वर्षांपासून अध्यापनाचे व संशोधनाचे कार्य करीत आहात. आपण आजपर्यंत एकूण 15 विद्यार्थ्यांना संशोधनाचे मार्गदर्शन केले आहे तसेच, आपले मायनर व मेजर असे एकूण 6 राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत तर आपले 100 पेक्षा जास्त रिसर्च पेपर हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित आहेत.  आपण 700 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये संशोधन पेपर मांडले आहेत, अनेक संशोधन पत्रिकाचे संपादन करून आपले एकूण 27 पुस्तके प्रकाशित झाले आहेत. या आपल्या कार्याची दखल घेऊन अनेक  स्तरावर आपला कित्येक वेळा सन्मान झालेला सर्वाना ज्ञात आहे. त्याच बरोबर आपण आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेऊन मागील 20 ते 25 वर्षांपासून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळातील विविध स्तरातील सदस्य, व्यवस्थापन सदस्य अशा अनेक मंडळावर अनेक पदे भूषवून आपण आज पर्यंत कार्य करीत आहात. 

त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर या ठिकाणी सुद्धा आपण संशोधन मार्गदर्शन म्हणून कार्य करत आहात.आपण आज पर्यंत सर्व पदे स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर मिळविलेली आहेत, कारण  आजपर्यंत आलेले सर्व यूजीसी अॅक्ट, सर्व शैक्षणिक धोरणे आणि विद्यापीठीय कायदे, यांच्याबद्दलची पुरेपूर माहिती व सखोल ज्ञान कदाचित एखाद्या तज्ञांना सुद्धा नसेल.सामाजिक:-सामाजिक बाजूने सांगायचे झाले तर, आपण कित्येक प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना येणाऱ्या अडचणी वेळोवेळी दूर केलेले सर्वांना माहित आहे. आपण माझ्या सारख्या कित्येक जणांच्या अडी-अडचणीत मदत केलेली आम्ही सर्वानी पहिली आहे आणि हक्कासाठी लढण्याकरिता आपण हत्तीचे बळ माझ्यासारख्या कित्येकामध्ये निर्माण केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या नोकरीवर रुजू होण्याची समस्या, रूजू झाल्यानंतर प्राध्यापकांच्या प्रोमोशन संदर्भाततील समस्या, जॉइन्ट डायरेक्टर कार्यालयात येणाऱ्या अडचणी, प्लेसमेंट असो वा, सर्वांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा किंवा विद्यापीठ स्तरावरील वेगवेगळ्या कमिटी या सर्वांच्या माध्यमातून आपण अनेकांना मदत केलेली आम्ही पहिली आहे. कोणाच्याही सुखा दुःखात आपण नेहमी उपस्थित असतात वेळ प्रसंगी खुप जणांना आपण नौकरी असो अथवा आर्थिक अडचण असो, आपण केलेली  आथिर्क मदत आम्हास ज्ञात आहे.संघर्ष:- संघर्षाची बाजू मांडताना आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आपण प्राध्यापक म्हणून रुजू झालात त्या वेळ पासून तर आज पर्यंत आपण इथल्या जातीव्यवस्था मानणाऱ्या व प्रस्थापितांच्या विरोधात आपला संघर्ष सुरू ठेवला आहे. आपण रुजू होहून थोडेच दिवस झाले नाही तर, आपल्यावर अन्याय होण्यास सुरुवात झाली व  आपण आपले सर्व कुटूंब घेऊन बुद्धाचा मार्ग अवलंबून शांतपणे उपोषण करून आपले अधिकार मिळवले व कोणीच स्वतःहाच्या अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून आपला संघर्ष सुरू ठेवला आहे.आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या बोध वाक्या प्रमाणे जीवन जगता. "चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते.....त्यांच्यात स्वतः च अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते.....एकटे पडण्याची भीती त्यांनाच असते,ज्यांना गुलाम म्हणून जगण्याची सवय असते"."शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस वाघ होऊन जगा". - डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारा प्रमाणे आपण एका वाघासारखे जीवन जगताना आम्ही सर्वांनी पाहिले आहे.विद्यापीठाच्या इतिहासात ज्या ज्या लोकांची मक्तेदारी होती, ज्यांचे मागील 25 ते 30 वर्षांपासून हुकूमशाही होती, कोणत्याच  इतर व्यक्तीना विद्यापीठाच्या कोणत्याच कमिटी, अभ्यास मंडळ, परीक्षेच्या वेगवेगळ्या कमिटीत ज्यांना कधीच संधी मिळत न्हवती अश्या सर्व जातीतील वंचित समूहाला तूम्ही योग्य न्याय देण्याचे कार्य केले. तुम्ही कितीही आंदोलनं रस्त्यावर उतरून केलेली आहेत,  कुलगुरु असो अथवा UGC चे अध्यक्ष त्यांच्या गाडी अडवुन, गाडीवर बसून आंदोलनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत हे सर्वांनी पाहिले आहे. मार्च 2016 यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही प्राध्यापकांनी  विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मागणी केलीली आपण आयबीएन लोकमत या टीव्ही चॅनेल  द्वारे एक्सपोज करून उघडीच आणली आणि यावर्षी, याच महिन्यात ऑगस्ट 2020 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाताने सुद्धा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची मागणी केली हे आपण परत एकदा आयबीएन लोकमत या टीव्ही चॅनेल द्वारे एक्सपोज करून उघडीच आणले. अशा प्रकारची कृती करणारे अध्यापक जाणून-बुजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदनाम करण्याचे षड्यंत्र सातत्याने करत आहेत. अशा लोकांना त्यांची जागा दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे नाव उच्चशिखरावर सातत्याने घेऊन जात आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.   18 ऑगस्ट 2020 नंतर ज्या विद्यार्थ्यांच्या पी. एच. डी. चे  दोन्ही रिपोर्ट आल्यानंतर 15 दिवसाच्या आत मौखिक परीक्षा घेण्यात येईल असे परिपत्रक काढण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना भाग पाडले. त्याबद्दल आपले धन्यवाद व अभिनंदन.मागच्या दोन ते तीन वर्षामधील गोष्ट आहे आपण सिनेट साठी उमेदवार म्हणून उभे होतात आणि आपल्याला निवडून न येण्यासाठी इथल्या जातीवादी, प्रस्थापित, कित्येकांनी प्रयत्न केले, काही जणांच्या बुडाला आग लागली आणि ते स्वतःहून हा प्रचार करतांना आम्ही पहिला आहे की कोणीही निवडून आले तरी चालेल पण, डॉ. शंकर अंभोरे निवडून नाही आले पाहिजे. खरं म्हणजे त्याच वेळेस डॉ. शंकर अंभोरे यांचा विजय झाला.त्या नंतर आपण व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून निवडून आलात आणि सर्व विरोधक कोमातच गेले. आपल्या बद्दल लिहिण्या साखरे खुप आहे पण या लिहिण्यास मर्यादा पडतात म्हणून थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहिण्याबद्दल किंवा बोलल्याबद्दल कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांना एवढेच म्हणेन की, "शितावरून भाताची परीक्षा करता येत नाही" तसे सरांचा अनुभव घेतल्याशिवाय सरांचा खरा स्वभाव लक्षात येत नाही.आपल्या बद्दल सारांश स्वरूपात बोलायचे झाले तर, संघर्ष म्हणलं की तथागत  गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व बुद्धी सम्राट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा विसर पडणे शक्य नाही. कारण जगाच्या पाठीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची तुलना कोणा बरोबरच करता येत नाही, म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी आहेत यात काही शंका नाही. म्हणून असे म्हणता येईल संघर्षातून स्वतःची वाट निर्माण करणारे, स्पष्टवक्ते, आंबेडकरी विचाराचे सच्चे पाईक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वेळोवेळी समस्या सोडवणारे, विद्यापीठीय कायदेतज्ञ, गुरुवर्य, आदरणीय प्रो. डॉ. शंकर अंभोरे सर आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपण शैक्षणिक संघर्ष युद्धाची यापुढे अशीच भुमिका सुरू ठेवाल यात काही शंका नाही. आपल्या पावलावर पाऊल टाकून येणारी प्रत्येक पिढी शैक्षणिक वाटचालीत समाविष्ट असेल. आपण केलेले कार्य हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहे. 

प्रा.धम्मपाल घुंबरे बीड जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर