पांडुरंगाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून हजारो वारकरी जाणार!अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेश आंदोलन- अशोक हिंगे


बीड (प्रतिनिधी) दि.28 वारकरी संप्रदायाने लॉकडाऊन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे 
करोना संक्रमणामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून  बंद असलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुली करण्यासाठी 31 अॉगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेनं एक लाख वारकऱ्यांसोबत मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करणार आहेत. मराठवाड्यातून हजारोच्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत, मंदिर भक्तांसाठी फुल्ल करावं या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले आहे.
करोना संसर्गामुळे गेल्या चार पाच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे याचा फटका सर्वांना बसला आहे राज्यात मिशन बिगिन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असेल तरी धार्मिक स्थळांना आणि सण- उत्सवांना तितकासा दिलासा मिळाला नाही यंदा आषाढीवारी प्रतिकात्मकरित्या साजरी करण्यात आली आषाढी याञेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली  होती त्याशिवाय भजन किर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे या सगळ्याच मुद्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे याच नाराजीच्या स्फोट म्हणून वारकऱ्यांनी एक लाख वारकरी घेऊन  पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार आहेत या वारकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठींबा मिळाल्याने वारकऱ्यांच्या लढ्याला अधिकच धार आली आहे 
देशात आणि राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर इतिहासात प्रथमच भाविकांना दर्शनासाठी  बंद करण्यात आले होते आता वारकऱ्यांना प्रदीर्घ कालावधी नंतर विठुभक्तांना आणि वारकऱ्यांन्या  विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे    
त्यामुळे विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे व विश्व वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. जगन्नाथ महाराज तसेच इतर वारकरी संंघटनानी येत्या 31 अॉगस्ट 2020 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख वारकऱ्यांन्या सोबत घेऊन मंदिर प्रवेश करणार आहे तरी मराठवाड्यातील सर्व वारकऱ्यांनी भजनी मंडळानी तसेच पायीवारी करणाऱ्यानी  व सर्व भाविक भक्तांनी या आंदोलनास पंढरपूर येथे 31 अॉगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक हिंगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केले आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर