कोवीड योद्धा डॉ संध्या लाटे यांची हेळसांड! डॉ. गवळी यांना निलंबित करा - बबन वाडमारे, संतोष जोगदंड मागणी
बीड (प्रतिनिधी) दि.19 डॉ संध्या लाटे या रायमोह ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मेडिकल आॅफीसर म्हणुन कार्यरत आहेत. त्या सध्या कोव्हीड ड्युटीवर असुन कोंरटाईन वॉर्डात काम करीत आहेत. काल त्या पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची तब्येत सिरीयस झाल्याने त्यांना बीड येथील लोटस हॉस्पीटल बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष जोगदंड यांनी गवळी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
त्या ठिकाणी तेथील डॉ.ने पेशंट करोना पॉझिटीव्ह असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे सर्टिफिकेट मागितले. त्यानंतर पेशंटचे नातेवाईक यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गवळी यांना संपर्क केल्यानंतर मी ते देवु शकत नाही जी पॉझिटिव्ह रुग्णाची यादी आहे तीच दाखवा अशा प्रकारचे ऊत्तर देवुन भ्रमणध्वनी बंद करून टाकला. शेवटी आम्ही बीडचे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी ते करोनान पॉझिटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिले त्यानंतर रुग्णावर उपचार सुरु झाले. स्वताच्या जिवाची बाजी लाऊन कोव्हीड मध्ये ड्युटी करणाऱ्या कोव्हीड योद्धा डॉ संध्या लाटे यांच्या वर हि वेळ येत असेल तर सर्व सामान्य नागरिक यांचे काय झाली होत असतील? तेंव्हा अशा मुजोर तालुका वैद्यकीय अधिकारी शिरुर (कासार) डॉ गवळी यांच्या वर त्वरीत कारवाई करावी असी मागणे एका पत्रकाद्वारे झाली आहे.
Comments
Post a Comment