संत विचारांचे पाईक सोपान कुकडे यांना श्रद्धांजली
सिरसाळा (प्रतिनिधी) -:धारूर तालुक्यातील कान्नपुर येथील रहिवाशी व माजलगाव कालवा वसाहत सिरसाळा येथे वाहन चालक म्हणून जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांच्या परिचयात व संपर्कात असलेले कै सोपान धोंडिबा कुकडे उर्फ काका यांचे छोट्याशा अपघाताने अकाली दुःखद निधन झाले. कुकडे यांच्यावर संत विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे शांत संयमी वा समंजस व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने संत विचारांचा पाईक गमावला असल्याची भावना श्रद्धांजलीत व्यक्त केली यावेळी अभियंता श्री पी. एम. जाधव साहेब, एस बी फुलारी, एम एम मुंडे, राजकुमार सिनारे आणि श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे व जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते..
Comments
Post a Comment