खबरदार! स्वॅब‌ देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हे दाखल होणार


बीड (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब‌ तपासण्यात येतात. परंतु काही महाभाग स्वॅब‌ देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करत असल्याचे अनुभव सातत्याने येत असल्याने अशा व्यक्तींवर कायदेशीर बडगा उगारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता स्वॅब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे. 
बीड कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्रशासनामार्फत प्रसार थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बाधित रुग्णांच्या घनिष्ट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन विलगीलकरण करून आवश्यकतेनुसार त्यांची कोरोना तपासणी केली जाते. यासाठी त्या व्यक्तींना आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क करून जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब तपासणीसाठी वेळ व दिनांक निश्चित केला जातो. मात्र, काही व्यक्ती विविध कारणे देऊन स्वॅब‌ देण्यास आणि तपासणीस टाळाटाळ करतात. दिशाभूल करणे, चुकीचा पत्ता देणे, फोन बंद करून ठेवणे तसेच कर्मचाऱ्यांशी उध्दटपणे व अर्वाच्च भाषेत बोलणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, कोरोनाची साखळी तोडण्यात बाधा येत आहे. अशा महाभागांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी यापुढे कोणत्याही कारणास्तव स्वॅब देण्यास टाळाटाळ करुन नये. दिलेल्या वेळेत स्वॅब देण्यास हजर राहुन प्रशासनास सहकार्य करावे. तपासणीस टाळाटाळ अथवा नकार दिल्यास त्यांच्यावर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार कायदेशीर कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर