परळी ग्रामीण पोलीसांनी घेतले गाढवालाच ताब्यात!पोलीसांनी लावलेले झाड खाल्ले म्हणून कारवाई,
परळी वै.(प्रतिनिधी) -: खरं तर गुन्हेगाराला आणि त्यातही माणसाला अटक करण्याचे पोलिसांचे काम... पण आता चक्क पोलीस गाढवालाही ताब्यात घेऊन कारवाई करू लागले. परळी ग्रामीण पोलीसांनी एका गाढवाला ताब्यात घेऊन बांधून टाकले नंतर चूक लक्षात आल्यानंतर गाढवाला सोडून देण्यात आले. या प्रकाराची चवीने चर्चा केली जात आहे.
याचे झाले असे की, परळी ग्रामीण पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली. झाडेही बर्यापैकी आले. मात्र आज एका गाढवाने यापैकी एक झाड खाल्ले. पोलीसांनी लावलेले झाड खाने म्हणजे मोठा गुन्हाच! गाढवाने झाड खाल्ल्याचं समजताच पोलीसांनी संबंधित गाढवाला ताब्यात घेऊन डांबुन टाकले. एव्हढेच नव्हे तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी एका जमादाराची नियुक्तीही करण्यात आली.
पोलीसांनी गाढवाला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात पसरली आणि आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. ही चर्चा शहरात पसरल्यानंतर काही कार्यकर्ते चक्क गाढवाची जमानत घेण्यासाठी पोलीसात गेले. आपली गफलत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी गाढवाला सोडून दिले मात्र हा विषय बराच चर्चेत होता.
Comments
Post a Comment