रॕपीड अॕन्टीजन टेस्टचा आज दुसरा दिवस कोणत्या बुथवर कोणाची होणार टेस्ट
परळी वै.(प्रतिनिधी) -: परळीत रॕपीड अॕन्टीजन तपासणीची मोहिम काल पासुन सुरु करण्यात आली काल पहिल्या दिवशी 1321 नागरिकांनी आपली कोरोनाची तपासणी करुन घेतली यात 1254 जणांचा अहवाल अवघ्या पंधरा मिनिटांत जाहिर करण्यात आला आहे.1321 पैकी 67 नागरिकांचा अहवाल कोरोना पाॕझिटिव्ह आला आहे सरासरी 5 टक्के कोरोना बाधीत व्यक्ती आढळुन आले आहेत.
आज बुधवारी शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,सरस्वती विद्यालय,बस स्थानक व पंचायत समिती कार्यालय या चार बुथवर रॕपीड अॕन्टीजन टेस्ट घेतल्या जाणार आहेत.
प्रशासनाने रॕपीड अॕन्टीजन टेस्टसाठी चार बुथवर व्यवस्था करण्यात आली असुन नागरिकांनी दिलेल्या वेळेत नेमवुन दिलेल्या बुथवर आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,तलाटी राजुरे,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,नोडल अधिकारी डॉ दिलीप गायकवाड आदी अधिकारी वर्गानी केले आहे.
बुथ निहाय माहिती
——-
बुथ लोकनेते गोपीनाथ राव मुंडे नटराज रंग मंदिर ] मेडिकल असोसिएशन 318 सकाळी 9 ते 1 सराफा व्यापारी-127 दुपारी 2 ते 6
बुथ बस स्थानक]वाईन शॉप-38 सकाळी 9ते 10, कृषी सेवा व फर्टीलायझर-80 सकाळी 10 ते 11,मोबाईल शॉपी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल व्यापारी-100 सकाळी 11 ते 1, रोजंदारी मजूर हमाल व घरकामगार-200 दुपारी 2 ते सायंकाळी 5वाजेपर्यंत
बुथ श्री सरस्वती विद्यालय] सिद्धार्थनगर,अरुणोदय मार्केट, मोंढा मार्केट, इंदिरा नगर, जूना रेल्वे स्टेशन,पद्मावती गल्ली, विवेकानंद नगर, भिमवाडी, मिलिंद नगर, सुभाष चौक,व कंटेनमेंट झोन मधील नागरिक सकाळी 9 ते 1 व दुपारी 2ते 6
————–
बुथ पंचायत समिती ऑफिस]माणिक नगर, शास्त्रीनगर, औद्योगिक वसाहत ,शंकर पार्वती नगर, वड सावित्री नगर,स्नेह नगर,बसवेश्वर कॉलनी,वडार कॉलनी, मलीकपुरा,तळ विभाग व कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिक सकाळी 9 ते 1व दुपारी 2 ते 6
Comments
Post a Comment