सिद्धेश्वर इंगोले यांच काव्यस्पर्धेत यश..


परळी वै.(प्रतिनीधी) -: येथील कवी चित्रकार सिद्धेश्वर इंगोले यांनी सोलापूर येथील घे भरारी साहित्य समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरारी प्रिमीयम लीग २०  या  महा काव्यस्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.सोलापूर येथील घे भरारी साहित्य समूहाच्या वतीने भरारी प्रिमीयम लीग २०  (बी.पी.एल)महा काव्यस्पर्धेचे आयोजन  कवी तेजस गायकवाड, पुरूषोत्तम चंद्रात्रे,पवन तिकिटे यांनी केले होते.या स्पर्धेत दोनशे हून अधिक कवींना सहभाग घेतला होता.अंतिम फेरीसाठी  गुणानुक्रमे पन्नास स्पर्धक पात्र ठरविण्यात आले होते.
   अंतिम फेरीत 'माहेर' या विषयांवरील रचनांचे डॉ.पल्लवी बनसोडे परुळेकर,शरद कवठेकर, तृप्ती काळे या  तीन  नामांकित परीक्षकांकडून परीक्षण करण्यात आले.मे - जून - जुलै  या कालावधीत या स्पर्धेतील काव्यफेरी घेण्यात आलेल्या होत्या.या स्पर्धेत सिद्धेश्वर इंगोले यांनी तृतीय क्रमांक मिळविला याबद्दल कवी बालाजी कांबळे, साहित्यिक रानबा गायकवाड,सिनेनाट्य दिग्दर्शक प्रा.सिद्धार्थ तायडे, विकास वाघमारे,मुक्तविहारी,लक्ष्मण लाड,गणगोपलवाड,कवी राजकुमार यल्लावाड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.घे भरारीच्या नियोजित काव्यसंमेलनात या स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर