रिमझिम पावसामुळे डिघोळ येथील मुख्य रस्ता चिखलमय
सोनपेठ (प्रतिनिधी) -:तालुक्यातील डिघोळ येथील गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. गावातून शहराला जात असताना नागरिकांना चिखला मधून वाट शोधावी लागत आहे.
सततच्या रिमझिम पावसामुळे मुख्य रस्ता चिखलमय बनल्याचे बघायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची ही दुरवस्था झाल्याची दिसून येत आहे.
नागरिकांना कामाला ये-जा करण्यासाठी मोठी काटे वरची कसरत करावी लागत आहे.
गावातून शहरात हॉस्पिटल आणि कामाकरता करता जात असताना.
दुचाकीवर तर पायी या चिखलातून रस्ता शोधत नागरिकांना जावे लागत आहे रात्री-अपरात्री काही अपघात या रस्त्यावरती होऊ नाहीत. म्हणून प्रशासनाने खबरदारी घेऊन या रस्त्याची दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे. अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment