नाथ प्रतिष्ठानचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार साजरा, धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार श्रींची स्थापना


परळी (दि. २१) - : ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोंढा मैदान येथे उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजता ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करून श्रीगणेश स्थापना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम साजरे करून केला जातो. नाथ प्रतिष्ठान च्या गणेशोत्सवाची सबंध राज्यभरात ख्याती आहे. 

परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने नाथ प्रतिष्ठान तर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. श्रींची स्थापना, विधिवत पूजा व आरती पारंपरिक मोंढा मैदान येथे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते दुपारी ठीक तीन वाजता कोविड विषयक सर्व खबरदारी व नियमांचे पालन करून करण्यात येईल, गणेशोत्सवादरम्यान काही सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत मंडळ विचार करत आहे अशी माहिती परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड व नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन (मामा) कुलकर्णी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर