बीड जिल्ह्यातून हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जाणार - सचिन मेघडंबर


बीड( प्रतिनिधी) दि.29 वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न
बीड येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न 31 आगस्ट रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिर खुले करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, विश्व वारकरी सेना या संघटनेला वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दिला आहे, यासंदर्भात आज बीड येथे बैठक आयोजन केलं होतं सचिन मेघडंबर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी बीड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सूत्रसंचालन डॉ.गणेश खेमाडे  यांनी तर प्रस्तावना अजय सरवदे यांनी केली यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव बीड जिल्ह्यातून 25 हजार वारकरी व कार्यकर्ते पंढरपूरला विठ्ठल रुक्माई च्या दर्शनाला जाणार, या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी कार्यकर्ते हजर होते. ज्येष्ठ नेते बबन वडमारे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष संतोष जोगदंड ,भारत तांगडे ,धम्मानंद साळवे ,वैष्णव दगडू  गायकवाड ,पोद्दार अंकुश,  जाधव बीड तालुका अध्यक्ष शेख युनूस शहराध्यक्ष लखन जोगदंड व आजी-माजी जिल्हा पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष समारोप करताना सचिन मेघडंबर यांनी सांगितले की बीड जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यामध्ये जास्तीत जास्त वारकरी कशी नेता येतील यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी यासाठी  मेहनत घ्यावी तर कार्यक्रमाचे आभार समारोप छाया गडगे यांनी केले
यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर