भारतीय संविधाना चा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - ऑल इंडिया पँथर सेनेची निवेदनाद्वारे मागणी
परळी (प्रतिनिधी) - :आज ता. परळी जि.बीड पोलीस स्टेशन परळी शहर येते निवेदनाद्वारे संविधानाचा अवमान करणाऱ्या समाजकंटक प्रवीण तराडे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,
बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून सर्व जाती-धर्माला न्याय देण्याचे काम केले आहे,
संविधान हे एका जातीपुरते मर्यादित नसून सर्व जाती-धर्माच्या लोकांचा प्राण आहे, संविधानाच्या माध्यमातून देशात समता,स्वतंत्र ,बंधुभाव नांदते याला तडा देऊन देशामध्ये समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा षंडयंञ करत असलेल्या .आश्या समाज विघातकाला आळा बसायला पाहिजे.
चूक करायची आणि माफी मागायची हे दिवसेंदिवस चालूच राहिलेला आहे आश्याना आळा घालण्यासाठी आश्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आशि मागणी अॉल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून करण्यात आली .
त्या वेळेस ऑल इंडिया पँथर सेनेचे परळी ता.अध्यक्ष आकाश तुपसमुद्रे, परळी ता.महासचिव विनोद घुंबरे,परळी शहर सचिव संविधान आदोडे, बीड जिल्हा सदस्य सिद्धांत जोगदंड, पँथर सदस्य अभिषेक कांबळे इ.उपस्तीत होते
Comments
Post a Comment