परळी नगरपालिकेच्या रोजंदारी मजुरांचा आरोग्य विमा भरण्यात यावा - बालासाहेब जगतकर
परळी (प्रतिनिधी) -: परळी नगरपालिकेच्या रोजंदारी मजुरांचा आरोग्य विमा भरण्यात यावा अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सध्या कोरोना वायरस मुळे पूर्ण परळी नगरपरिषदेचे रोजंदारी मजुर हे जेव्हा पासुन कोरोना वायरस सुरू झाला तेंव्हा पासुन आजपर्यंत परळी शहरातील स्वच्छतेची व जनतेच्या आरोग्याची काळजी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कायमस्वरुपी कर्मचारी यांच्या बरोबरीने काम करीत असुन जेव्हा हि अधिकारयाचे बोलावणे येतिल तेव्हा हजरच असतात ते ही तुटपुंज्या पगारावर. त्या साठी या मजुरांचा आरोग्य विमा यासह त्यांना आरोग्य किट जसे हाथमोजे ,मास ,गमबुट ,सॅनेटायझर, आरोग्य वरधक औषधोपचार अश्या विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशीही मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment