औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीची.पहिली प्रवास यात्रा एस.टी. ची
औरंगाबाद, दि.२० - राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात डफली बजाओ आंदोलनाची हाक दिली होती. १२ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले. सरकारला या आंदोलनापूढे नमते घेत एसटीला जिल्हा अंतर्गत चालू करण्याची परवानगी द्यावी लागली.
कोरोनाच्या साथीमुळे जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. सर्व व्यवहार व वाहतुक कोलमडलेली आहे. गोर-गरीब व जनसामान्यांची एस टी वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले. मात्र आता कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव राहिला नसल्याने त्यातच खासगी वाहतुकीला राज्यात परवानगी दिली असल्याने सर्वसामान्य लोकांच्या एसटीला ही परवानगी देण्यात यावी, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर डफली बजाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन गरीब जनतेला व सामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्यात एसटी ला परवानगी दिली. या पुढे ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल,असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अमित भुईगळ यांनी दिले. औरंगाबाद (पश्चिम) शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, औरंगाबाद (पूर्व)शहराध्यक्ष डॉ. जमील देशमुख तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी औरंगाबाद ते सिल्लोड असा एस टी ने प्रवास करून गाडीचे चालक संतोष पंडित व वाहक आदिनाथ गायकवाड यांचा सत्कार केला. राज्यात एसटी ला सुरुवात झाली असून जनतेने कोणत्याही प्रकारच्या भेटीला न बाळगता आपण एसटीने प्रवास करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे. शासनाने कोरोना प्रतिबंधाकरिता जे नियम दिले आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे. असे ही यावेळी सांगण्यात आले.
Comments
Post a Comment