परळी पंचायत समितीचे प्रांगण बहरले घनदाट वृक्षलागवडीनेतालुक्यातील ग्रामपंचायतीने हा वृक्षलागवडीचा आदर्श घ्यावा-संजय केंद्रे


परळी वै. (प्रतिनिधी) :- परळी पंचायत समितीच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या घनदाट वृक्ष लागवडीने प्रांगण बहरले असून वृक्षांची सरासरी आठ ते दहा फुटापर्यंत उंची गाठली आहे. हिरव्यागार घनदाट या वृक्षामुळे पंचायत समितीला वेगळे आकर्षण निर्माण झाले असून अशा प्रकारची वृक्ष लागवड तालुक्यातील 29 ग्रामपचायंतीने केली आहे. हाच आदर्श इतर ग्रामपंचायतीने सुध्दा घ्यावा असे आवाहन परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले आहे.
शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात चार गुंठे क्षेत्रात एकुण बाराशे झाडांची लागवड ऑक्टोंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये अंबा जांभूळ, चिंच, आव्वाळ, साग, पिंपळ, वड, चाफा, तुळस शेवगा, कडुनिंब, बाबु, बकळु, शिरु, कांचन आदीं बावीस प्रकारच्या झाडांची घनदाट लागवड करण्यात आली आहे. यासर्व वाढलेल्या झाडांची मााहिती स्वत: गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिली. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य जानिमियॉं कुरेशी, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड व महादेव गित्ते उपस्थित होते.
यावर्षांच्या लागवड केल्यानंतर त्यांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी तसेच लावलेल्या सर्व वृक्षांना पाणी मिळावे व त्यांची वाढ व्हावी याकरिता स्वतंत्र बोअर घेण्यात आले. तसेच सर्व बाराशे झाडांना ठिबंक सिंचनद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. जनावरांन पासुन संरक्षण व्हावे याकरिता चारही बाजुंनी लोखंउी संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. सभापती सौ.उर्मिलाताई बबनभाऊ गित्ते, उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या झाडांची योग्य प्रकारे जोपासना केली.
यापावसाळ्यात ही सर्व झाडे दहा फुटांपर्यंत उंच वाढली आहेत. त्यामुळे पंचायत समितीचा परिसर नयनरम्य व आकर्षक आणि लक्षवेधी बनला आहे. तालु्नयात घनदाट वृक्ष लागवड अंतर्गत सिरसाळा, टोकवाडी, लाडझरी,  नागापुर, गाढेपिंपळगाव, दादाहारी वडगाव, बोधेगाव आदी गावातुनही वृक्ष लागवड केल्यामुळे तालुक्यात आनंदी वातावरण व वृक्षलागवडीचे म्हत्व नागरिकांच्या लक्षात आले आहे.
यासर्व वृक्षांची संगोपन व संरक्षण करीत असतांना आठवड्यात एकतास पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी श्रमदान करीत असतात. गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश गुळभिले, शाखा अभियंता बी.बी.लांडगे, कृषी अधिकारी एस.एल.कांदे, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत बाभळे, विस्तार अधिकारी एस.व्ही.चालेकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश लहुरीकर यांनी या वृक्ष लागवडीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. परळी पंचायत समितीच्या या हिरवाईने नटलेल्या घनदाट वृक्ष लागवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर