दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळीची NEET परिक्षा केंद्र म्हणून निवड; १३ सप्टेंबर रोजी होणार NEET परिक्षा



परळी ( प्रतिनिधी )  देश पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या National Eligibility Cum Entrance Test NEET परिक्षेसाठी केंद्र म्हणून परळी वैजनाथ येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली आहे. संपुर्ण देशात NEET परिक्षेसाठी केवळ १५५ शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये परळी वैजनाथ शहराचा समावेश आहे. 

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालया अंतर्गत National Testing Agency द्वारे दरवर्षी MBBS व BDS कोर्सेसना प्रवेशासाठी NEET परिक्षा घेतली जाते. परिक्षेची रचना CBSE कडून केली जाते तर प्रत्यक्ष परिक्षा घेण्याची जबाबदारी National Testing Agency ची असते. 

२०१९ वर्षीच्या NEET परीक्षेला देशातून १४.१० लाख विद्यार्थी बसले होते. देशात वैद्यकिय व दंत महाविद्यालयात सुमारे ६६,००० जागा आहेत. म्हणजे एका जागेसाठी २० पेक्षा जास्त विद्यार्थी इच्छुक असतात. 

NEET परिक्षा ७२० गुणांची असते. भौतिक शास्त्र १८० गुण, रसायन शास्त्र १८० गुण तर जैविक शास्त्र ३६० गुण असे वर्गीकरण असते. बीनचूक उत्तरास ४ गुण मिळतात तर चूक उत्तरास १ गुण वजा केला जातो. 

“दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची आधुनिक इमारत व सुविधा लक्षात घेता सध्या करोना परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यास सुरक्षित व सोयीचे होणार आहे” असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

झी टाॅकिजवर गणेश महाराज गुटटे यांच्या प्रभावी कीर्तनाची मालिका सुरु

मनुवाद्यांनो 'राजगृह' नुसती इमारत नसून मानवतावादी चळवळीचं ऊर्जा स्थान आहे - संजय पाडमुखे

तीर्थक्षेत्र परळीचे महत्त्व तीर्थक्षेत्र आळंदी सारखेच आहे - ह-भ-प डाॅ सुदाम महाराज पानेगावकर